संजोग भिकू वाघेरे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) पिंपरी-चिंचवड विभागाचे माजी अध्यक्ष संजोग वाघेरे यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनीय आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (पीसीएमसी) नगरसेवक म्हणून त्यांनी सलग तीन वेळा काम केले असून औद्योगिक नगरीचे महापौरपदही त्यांनी भूषवले आहे. तथापि, शिवसेना (UBT) मध्ये सामील होण्याचा त्यांचा अलीकडील निर्णय त्यांच्या राजकीय प्रवासात एक महत्त्वपूर्ण वाटचाल दर्शवितो. त्यांचा अनुभव आणि नेतृत्वगुण ओळखून पक्षाने त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. वाघेरे यांचे हे धोरणात्मक पाऊल राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आणि सेवा करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा दर्शवते.
माझा संक्षिप्त परिचय
पिंपरी गावाचे सरपंच तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांचे चिरंजीव
• वडिलांच्या निधनानंतर १९८७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड आणि राजकारणात प्रवेश
• १९९२ ते २००२ सलग तीनवेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य
• १९८९ साली पीसीएमटी समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.
• १९९५ साली पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर म्हणून निवड आणि शहराच्या विकासात व्यापक योगदान
• यानंतर सौ. उषा संजोग वाघेरे पाटील या सन २००७-२०२२ सलग तीन वेळा नगरसेविका
• २००८ साली सौ. उषा संजोग वाघेरे पाटील यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षा म्हणून निवड
• सौ. उषा संजोग वाघेरे पाटील यांची सन २०१७-२०२२ पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या म्हणून निवड
• २०१७ ते २०२२ दरम्यान श्री संजोग वाघेरे पाटील यांनी सलग ६ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर - जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली
• जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था, सातारा
• पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन उपाध्यक्ष
• महात्मा फुले विद्यालय विकास समिती, पिंपरी वाघेरे अध्यक्ष
• पिंपरी चिंचवड किक बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष
• फेब्रुवारी २०२४ पासून शिवसेना मावळ लोकसभा संघटक पदाची जबाबदा
Campaign Services
Door-to-door canvassing
Public rallies
Social media promotion
Our team will conduct door-to-door canvassing to connect with the voters and understand their needs and concerns.
We will organize public rallies to engage with the community and share our vision and promises for a better future.
Leverage the power of social media to reach a wider audience and spread awareness about our campaign and agenda.
आपण मतरूपी आशीर्वाद दिलात तर खालील मुख्य मुद्यांवर भर देऊन मावळ लोकसभेत विकासाचे नवे पर्व साकारणार.
पिंपरी चिंचवड शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन, शहराला होणारा पाणीपुरवठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार.
पवना, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प अंमलबजावणीसाठी तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राकडे तत्परतेने पाठपुरावा करणार.
थेरगाव, वाकड, पिंपळे सौदागर ही पिंपरी चिंचवड शहराची उपनगरे हिंजवडी आयटी पार्क ते बाणेर या मेट्रो मार्गाला जोडण्याचा प्रयत्न करणार.
पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग निगडीपर्यंत विस्तारित करणार. तसेच निगडी > हिंजवडी आयटी पार्क व निगडी > तळवडे आयटी पार्क मार्गे चाकण एमआयडीसी तसेच निगडी तळेगाव एमआयडीसी पर्यंत मेट्रो मार्ग विस्तारीकरणाचा प्रयत्न करणार.
पिंपरी चिंचवड शहरात वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचे रॅकेट यावर पोलीस यंत्रणेमार्फत तत्पर कारवाई करणार.
लोणावळा - पुणे मार्गावर ज्यादा लोकल फेऱ्या आणि तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांच्या निर्मितीचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार.
लोणावळा ते दापोडी या लोकल मार्गावरील रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरण, विस्तारीकरणाचे काम वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार.
लोणावळा, खंडाळा, माथेरान इत्यादी पर्यटन स्थळे, गड-किल्ले, लेण्या तसेच श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र एकविरा देवी यांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार.
तळेगाव, चाकण, रसायनी, तळोजा येथील कंपन्यांमार्फत प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडले जाऊ नये यासाठी औद्योगिक क्षेत्रात
सीईटीपी प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न करणार.
नवीन रोजगार निर्मितीसाठी चाकण, तळेगाव, रसायनी, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि आयटी पार्क्स येथे नवीन उदयोग व
कंपन्या आणण्यासाठी राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर प्रयत्न करणार.
औद्योगिक क्षेत्रात अडचणीत आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारकडून तत्परतेने मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करणार.
पनवेल महानगरपालिकेतील समाविष्ट गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढणार, त्यांना मुख्य प्रवाहात आणणार.
पनवेल शहरातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, नवी पनवेल, तळोजा येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार.
पनवेल शहरात अत्याधुनिक आणि सुसज्ज असे मोठे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न करणार.
खोपोली शहराला विष्यात हक्काचा पाणी पुरवठा मिळावा यासाठी स्वतंत्र पाणी साठा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग यावर होणाऱ्या अपघातात रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी खोपोली येथे
इंस्टाग्राम फीड
संपर्क
पिंपरी गावठाण, पिंपरी
+91 9999 9999 99